Advertisement

गुरुवारी आणि शुक्रवारी १० टक्के कपात

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून हे काम हाती घेण्यात आलं आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी १० टक्के कपात
SHARES

गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पश्चिम उपनगरे, शहर भागातील एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल आणि एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई 3 अ उदंचन केंद्रामध्ये (pumping station) ९०० मिलीमीटर व्यासाची झडप (Sluice Valve) बसवण्याच्या कामकाजासाठी गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्र बंद राहणार आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर इथळ्या केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसवण्यात येणार आहे.

हा उदंचन संच बसवण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर इथलं मुंबई 3 अ उदंचन केंद्र हे गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणीकपात होईल. या कारणानं, उपरोक्त कालावधित भांडुप संकुलद्वारे होणाऱ्या पश्चिम उपनगरे तसंच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल आणि एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.



हेही वाचा

ठाण्यात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

ठाण्यात महिलांसाठी महिन्यातून एक दिवस विशेष लसीकरण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा