Advertisement

मुंबईच्या तलावांमध्ये ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा


मुंबईच्या तलावांमध्ये ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा
SHARES

जून महिन्यात मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात मान्सूननं हजेरी लावली. या हजेरीनंतर मुंबईत मुसळधार पावसाची अपेक्षा होती. परंतु, दिलासादायक पाऊस झाला नाही. त्याशिवाय तलाव क्षेत्रातही पुरेसा पाऊस झाला नाही. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईला ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.

जुलै महिन्याच्या ३ तारखेपासून पावसाने जोरदार हजेरी लावत मुंबईकरांन दिलासा दिला. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळं उकाडा ही कमी आहे. परंतु, या महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात लावलेल्या हजेरीमुळं ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.

सोमवारी तलावांमध्ये ३,३९,०६७ मिलियन लीटर पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तसंच, मुंबईत व आसपासच्या परिसरात १४ व १५ जुलै रोजी मुसळधार पाऊस इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली असून, सध्या विश्रांती घेतली आहे. दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.हेही वाचा - 

University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बसRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा