क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !

 Sham Nagar
क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !
क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !
क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !
क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !
क्रांतीनगर की डंपिंग ग्राउंड !
See all

जोगेश्वरी - जोगेश्वरी पश्चिमनमधल्या क्रांतीनगरच्या बेहरामबाग रोडवर 'ख्रिस्त द किंग चर्च'समोर परेरा चाळीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा न उचल्यामुळे या परिसराला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. या परिसरात कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याचा ढीग साचला आहे. सध्या मुंबईत पावसामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसारख्या साथीच्या रोगांनी डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करुनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी नेमलेले असताना एकही कर्मचारी येथे कचरा उचलायला येत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments