Advertisement

डोंबिवली ते ठाणे जलमार्गावर लवकरच धावणार ई-वॉटर टॅक्सी

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान जलद प्रवासासाठी ई-वॉटर टॅक्सी ही सेवा अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.

डोंबिवली ते ठाणे जलमार्गावर लवकरच धावणार ई-वॉटर टॅक्सी
SHARES

रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यांवरील तासनतास होणाऱ्या वाहतूककोंडीतून डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होणार आहे.

मुंबई (mumbai) आणि नवी मुंबईच्या (navi mumbai) धर्तीवर डोंबिवलीतही (dombivli) लवकरच ई-वॉटर टॅक्सी (E-water taxi) सेवा सुरू करण्यात येणार आहे.

राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली.

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान जलद प्रवासासाठी ई-वॉटर टॅक्सी ही सेवा अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.

याच धर्तीवर डोंबिवलीतही ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांच्यात मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात या प्रकल्पावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

डोंबिवलीहून सुरू होणारी ही ई-वॉटर टॅक्सी डोंबिवली ते ठाणे, मीरा-भाईंदर तसेच डोंबिवली, दिवा, ठाणे ते थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अशा मार्गांवर धावणार आहे.

या प्रकल्पासाठी डोंबिवलीतील मोठा गाव जेटीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पाचे उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

ही जलवाहतूक सेवा लवकरच प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. या ई-वॉटर टॅक्सी प्रवासाच्या तिकीट दराबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.



हेही वाचा

मुंबईत नव्या बांधकाम प्रकल्पांवर, स्विमिंग पूलवर 20% पाणी कपात

पवई तलाव परिसराचा कायापालट होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा