Advertisement

बंद स्ट्रीट लाईट्समुळे ईस्टर्न फ्रीवे धोकादायक

रस्त्याच्या अनेक भागांवरील स्ट्रिट लाईट बंद आहेत.

बंद स्ट्रीट लाईट्समुळे ईस्टर्न फ्रीवे धोकादायक
SHARES

दक्षिण मुंबई ते घाटकोपरला जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेवरील स्ट्रिट लाईट बंद असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

रस्त्याच्या अनेक भागांवरील स्ट्रिट लाईट बंद आहेत. 16.8 किमीचा सिग्नल फ्री मार्ग दक्षिण मुंबईला पी डी'मेलो रोड ते घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडशी जोडतो. लाखो वाहनचालक पूर्व उपनगरांमध्ये जाण्यासाठी याला प्राधान्य देतात.

"वेग मर्यादा 80 किमी प्रतितास आहे आणि पथदिवे नसल्यामुळे रस्ता खूप धोकादायक बनतो. अपघात कधीही होऊ शकतात," अशी तक्रार वाहनधारक हेमंत विचारे यांनी फ्री प्रेसला केली. 

हा उड्डाणपूल एमएमआरडीएने बांधला होता आणि 2015 मध्ये ऑपरेशन आणि देखभालीसाठी पूर्णपणे बीएमसीकडे सोपवला होता. 

फ्री प्रेसने बीएमसीचे मुख्य अभियंता (पुल) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "मला माहिती आहे की फ्रीवेच्या काही भागांमधील दिवे काम करत नाहीत. यांत्रिकी आणि विद्युत विभागाकडून दिवे बसवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी निविदा आणि कोटेशन प्रक्रिया सुरू आहे."

तथापि, मुख्य अभियंता (यांत्रिक आणि विद्युत) कृष्णा पेरेकर म्हणाले की, त्यांच्या विभागाने कोणतीही निविदा काढलेली नाही. नवीन दिवे बसवण्याची किंवा दिवे दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू नाही.

"शहरातील विशिष्ट भागासाठी दिवे नेहमीच मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. संबंधित भागातील वॉर्ड कार्यालयांनी या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटी रस्त्यावर वीजपुरवठा करतात," असे ते म्हणाले.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या बाजूने फ्रीवेसह परिसरात वीज पुरवठ्यात कोणताही खंड पडत नाही.

पूर्व फ्रीवेच्या काही भागात स्ट्रिट लाईन काम करत नसल्याची ही पहिली घटना नाही. जुलै 2023 मध्ये, फ्रीवेवरील स्ट्रिट लाईट बंद होत्या.



हेही वाचा

कर्नाक पूल 'या' आठवड्यात पुन्हा सुरू होणार

मुंबई महापालिका 5 वर्षांसाठी सल्लागारांची नियुक्ती करणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा