'जाणीवपूर्वक परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी होणार'

  Mumbai
  'जाणीवपूर्वक परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी होणार'
  मुंबई  -  

  जाणीवपूर्वक उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविण्याचे आदेश सर्व विभागीय मंडळांना दिल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. जाणीवपूर्वक उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनी जर व्हायरल झालेल्या झालेल्या प्रश्नपत्रिकेचा लाभ घेतल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्यास त्यांचावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पेपर सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक जॅम आणि इतर कारणांसाठी 30 मिनिटे विद्यार्थ्यांना उशिरा येण्याची सवलत दिली जाते. या सवलतीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना पेपर अगोदरच मिळाला काय? याची चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणामुळे एकीकडे प्रशासन कॉपी आणि पेपर लीक प्रकरणाला आळा घालण्यात अपयशी ठरत असताना दुसरीकडे याचं ओझं परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर टाकण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

  28 फेब्रुवरी ते 25 मार्च 2017 पर्यंत झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये मुंबई विभागीय मंडळामधील मराठी, एसपी, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच वॉटस्अॅपवर पोहोचल्या होत्या. याबाबत काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

  विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिका वितरित होण्यासाठी सर्वसाधारणपणे पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धातास अगोदर प्रश्न पत्रिकांची सीलबंद पाकिटे उघडून, प्रश्नपत्रिका वितरणाची प्रक्रिया सुरु करतात. प्रश्न पत्रिकेचे सीलबंद पाकिट उघडण्याची प्रक्रिया साधारणपणे 40 मिनिटे अगोदर सुरु करावी लागते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.