Advertisement

पोलीस शिपाई ते जमादार यांना आठ तास ड्युटी, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कर्मचाऱ्यांच्या आठ तासांच्या ड्युटीबाबतच्या परिपत्रकावर स्वाक्षरी करत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

पोलीस शिपाई ते जमादार यांना आठ तास ड्युटी, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय
SHARES

मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला पोलिस कर्मचार्‍यांसह पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दर्जापर्यंतचे कर्मचाऱ्यांना आता आठ तास ड्युटी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कर्मचाऱ्यांच्या आठ तासांच्या ड्युटीबाबतच्या परिपत्रकावर स्वाक्षरी करत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता 50 वर्षांखालील पोलिसांना आठ तास काम आणि 16 तास आराम, तर 50 वर्षांवरील पोलिसांसाठी 12 तास काम आणि 24 तास आराम असा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. 17 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. पोलिसांची कार्यक्षमता वाढावी आणि पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात संजय पांडे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आठ तासांची अनोखी भेट दिली. यापुढे पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जापर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आठ तास काम करावे लागणार आहे.


मुंबई शहरात राहणाऱ्या तसंच पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना '८ तास कर्तव्य १६ तास आराम' हे कर्तव्य देण्यात यावं.

पोलीस स्टेशनपासून ५० किमीपेक्षा दूर अंतरावर राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना '१२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम' कर्तव्याचा पर्याय देण्यात यावा.

ज्या पोलीस अंमलदारांना '१२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम' हे कर्तव्य देण्यात येणार आहे, त्यांना साप्ताहिक रजा देण्यात येणार नाही

५५ वर्षांवरील अंमलदार, त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या उदा. उच्च मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या व्याधी/आजारांनी ग्रस्त असलेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या विनंतीप्रमाणे '८ तास कर्तव्य १६ तास आराम' किंवा '१२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम'कर्तव्ये देण्यात यावे.

'१२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम' कर्तव्य देताना अप्पल पोलीस आयुक्त आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्त यांनी पोलीस ठाण्यातील अशा कर्तव्याची यादी तयार करावी. निश्चित करण्यात आलेल्या कर्तव्याच्या ठिकाणीच फक्त '१२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम' कर्तव्य देण्यात यावं.

अप्पर पोलीस आयुक्तांनी '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' या कर्तव्य पद्धतीसाठी प्राप्त झालेल्या विनंती अर्जांची योग्यरित्या छाननी करावी आणि पात्र पोलीस अंमलदारांचीच विनंती मंजूर करुन त्यांना '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' कर्तव्य देण्यात यावं.

पोलीस ठाण्यातील कार्यलयीन कामकाज करणारे अमंलदार हे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत दहा तास कर्तव्य करतील.



हेही वाचा

आता पालिका शाळांमध्ये देणार अग्निसुरक्षा आणि बागकामाचे धडे

नवीन इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट अनिवार्य करण्याची पालिकेची योजना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा