Advertisement

८ नोव्हेंबर आणि नोटाबंदीसंदर्भातील 'या' ८ गोष्टी


८ नोव्हेंबर आणि नोटाबंदीसंदर्भातील 'या' ८ गोष्टी
SHARES

8 नोव्हेंबर 2017 रोजी नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले. 8 नोव्हेंबर 2016 च्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लागू केला होता. याची घोषणा त्यांनी टीव्हीवरील भाषणादरम्यान केली होती. 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. याचसोबत जुन्या नोटा बाजारात दाखल करण्याचे आदेश दिले होते. यासाठी सरकारनं जनतेला 50 दिवसांचा कालावधी दिला होता.



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर अनेकांनी त्याचा विरोध केला. ब्लॅकमनी बाहेर काढण्यासाठी उचलेलं हे मोदींचं पाऊल असल्याचं काहींनी म्हटलं. तर काहींनी विचार न करता उचलेलं हे पाऊल असल्याचा आरोप केला. पण खरच या एकवर्षात नोटबंदीचा काही फायदा देशाला झाला का? देशातील काळा पैसा बाहेर येण्यास काही मदत मिळाली का? नोटबंदी लागू झाल्यानंतरचे हे वर्ष कसे होते? याच मुद्द्यांवर आम्ही प्रकाश टाकणार आहोत.


1) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा नोटाबंदीचा निर्णय

भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण पहिल्यांदाच जुन्या नोटांवर बंदी घालून नवीन नोटा बाजारात आणल्या गेल्या. यापूर्वी नवीन नोटा बाजारात यायच्या पण जुन्या नोटा कधीच बंद करण्यात आल्या नव्हत्या.



16 जानेवारी 1978 साली तत्कालिन मोरारजी सरकारनं राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्या मार्फत वटहुकूम काढला. त्या वेळी 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरवण्यात आल्या होत्या.


2) 99 टक्के जुन्या नोटा बँकेत जमा

भारतात असलेला ब्लॅक मनी सरकारच्या तिजोरीत यावा हा या नोटबंदीमागचा  मुख्य उद्देश होता. पण आँगस्टमध्ये दिलेल्या आरबीआयच्या एका आकडेवाडीनुसार 500 आणि 1000 च्या 99 टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.



3) 2.24 लाख बनावच कंपन्यांवर टाळा

नोटाबंदीनंतर सरकारनं बनावट कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सरकारनं या कंपन्यांची नोंदणी रद्द केली. शिवाय या कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले.


4) सोन्याच्या मागणीत घट

नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली होती. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक वर्षात देशात सोन्याच्या मागणीत 25 टक्क्याची घट झाली आहे. सणासुदी दरम्यान सोन्याची अधिक खरेदी झाली होती. पण 3 टक्के जीएसटी टॅक्समुळे सोन्याच्या मागणीत घट झाली.



५) डिजिटल ट्रँजेक्शनमध्ये स्थिरता

नोटाबंदी लागू होताच डिजिटल ट्रँजेक्शनमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. पण नवीन नोटा बाजारत येताच डिजिटल टँजेक्शनमध्ये पुन्हा घट झाली. २൦१७-२൦१८ अॉक्टोबरपर्यंत डिजिटल टँजेक्शनचा आकडा १൦൦൦ कोटी रुपयांच्या घरात गेला. नोटांची आवाक पुन्हा वाढल्यानं डिजिटल ट्रँजेक्शनमध्ये स्थिरता आली आहे. भारतात ९५ टक्के काम हे कॅश देऊन होते.



६) देशाच्या जीडीपीमध्ये घट

गेल्या एक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये २ टक्क्यांची घट झाली आहे. २൦१६ मध्ये भारताचा विकास दर ७.१ टक्के होता. २൦१७ च्या चौथ्या तिमाहीतील विकास दर ६.१ टक्के होता. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २൦१७ मध्ये जीडीपी वाढीचा दर ५.७ टक्क्यांवर आला.



७) 'ईज ऑफ डूइंग बिजनेस' रिपोर्टमध्ये भारत टॉप १൦൦ देशांमध्ये

जागतिक बँकेच्या 'ईज ऑफ डूइंग बिजनेस' रँकिंगमध्ये भारतानं मोठी मजल मारली आहे. व्यवसाय करण्याच्या बाबतीत भारतानं १३൦ स्थानावरून १൦൦ व्या स्थानावर उडी मारली आहे.



८) नोटाबंदीच्या दरम्यान १൦൦ हून अधिकांचा मृत्यू

मीडिया रिपोर्टनुसार, नोटाबंदी दरम्यान १൦൦ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. बँकांसमोर लाइनीत उभं राहून अनेकांनी आपला जीव गमावला.


( टीप - ही सर्व माहिती दुसऱ्या मीडिया रिपोर्टवर आधारित आहे. )


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा