Advertisement

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू

500 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू
SHARES

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Puraskar 2023) सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना गौरवण्यात आलं.

नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमला तुफान गर्दी झाली होती. भर दुपारी हा कार्यक्रम पार पडला.  

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. 500 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.  

उष्माघातामुळे सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 15 जण अत्यावस्थ असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी  सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृतांच्या नातेवाईका मदत केली जाणार आहे. तसेच उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

अनेकांना कळंबोली येथील  एमजीएम रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अधिकारी आणि डॉक्टरांकडून याबाबत माहिती घेत आहेत.

मंत्री दीपक केसरकर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील एमजीएम रुग्णालायत पोहचले आहेत. यासह अनेकांना वाशी येथील नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय, नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालय तसेच खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा