Advertisement

'इतके' हजार टन डाळिंब निर्यात घटली


'इतके' हजार टन डाळिंब निर्यात घटली
SHARES

डाळिंबाला वर्षभर विदेशात प्रचंड मागणी असते. यंदाही या डाळिंबाला मोठी मागणी आहे. तसंच, आंतरराष्ट्रीय बाजारात या फळाच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. परंतु, राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं अनेक मजूर आपल्या गावी गेल्यानं मजूर आणि वाहतूक यामधील गोंधळामुळं सुमारे ८ हजार टन डाळिंबाची निर्यात न झाल्याची माहिती समोर येत आहे.

डाळिंबाची निर्यात न झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. देशात २.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असून, त्यापैकी ६५ हजार हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचं समजतं. महाराष्ट्रात १.७ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचं पीक घेतलं जातं. त्यामधून २० लाख टन डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी ५५ ते ६० हजार टन डाळिंब महाराष्ट्रातून निर्यात केली.

गतवर्षी निर्यातक्षम डाळिंबाला किलोमागे सरासरी १०० रुपये भाव मिळाला होता. यावर्षी १३० रुपये भाव मिळाल्यानं निर्यात कमी होऊनही शेतकऱ्या अधिक पैसे मिळत होते. गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात ३,२७१ टन निर्यात केली होती. यंदा दोन महिन्यांत केवळ १७७३ टन निर्यात झाली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा