Advertisement

'या' पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर


'या' पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर
SHARES

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांमध्ये तडकाफडकी विधानसभा निवडणुका जाहीर केल्या असून ११ डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मिझोराम मध्ये या निवडणुका जाहिर केल्या आहेत. तर १२ ऑक्टोबरनंतर तेलगंणा या नवीन राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यामुळे आजपासूनच या पाचही राज्यात आचार संहिता लागू करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दिली.

तारखा पुढील प्रमाणे

छत्तीसगडमध्ये दोन टप्यात निवडणुका होणार असून इतर राज्यात पहिल्या टप्प्यातच मतदान केले जाणार आहे. या पाचही राज्यातील निवडणूक प्रक्रिया १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जागांसाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांसाठी मतदान केलं जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यातलं मतदान १२ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान २० नोव्हेंबरला होणार होईल. तर मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याव्यतिरिक्त राजस्थान आणि तेलंगणमध्ये ७ डिसेंबरला मतदानर होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी ही ११ डिसेंबरला होणार असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा