Advertisement

विद्युतदहिनीत अंत्यसंस्कारासाठी ५ ते ६ तास करावी लागते प्रतिक्षा

या मृतांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्युतदहिनीत अंत्यसंस्कारासाठी ५ ते ६ तास करावी लागते प्रतिक्षा
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. महापालिकेच्या अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार असून, काहींचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळं मरण पावलेल्यांना विद्युतदाहिनीत जाळावं लागतं. त्यामुळं या विद्युतदहिनीत अत्यंसंस्कारासाठी ५ ते ६ तासांची प्रतिक्षा करावी लागत आहे.

कोरोना हा जीवघेणा व्हायरस असल्यानं दररोजचा मृतांचा आकडा जास्त आहे. त्यामुळं काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या चरई आणि शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत बिघाड झाला होता. विद्युतदहिनीत मृतदेह जाळल्यानंतर काही वेळ थांबावं लागतं. परंतु, सतत येणाऱ्या मृतदेहांमुळं विद्युतदहिनीला विश्रांती मिळत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं यामध्ये बिघाड होत आहेत.  

शिवाजी पार्क स्मशानभूमीत एका वेळी ६ मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीनं लाकडावर अंत्यसंस्कार करता येतील अशी सोय आहे, तर दोन विद्युतदाहिनी आहेत. त्यापैकी विद्युतदाहिनीसाठी अनेकदा थांबावं लागतं. एका विद्युतदाहिनीत झालेला बिघाड आणि अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येनं आलेले पार्थिव यामुळं मरिन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत पेच निर्माण झाला होता.



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा