Advertisement

बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी खूशखबर, वीज बिलात होणार कपात!


बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी खूशखबर, वीज बिलात होणार कपात!
SHARES

ही बातमी बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा देणारी आहे. कारण येत्या नवीन वर्षांत बेस्ट प्रशासन वीज बिलामध्ये कपात करणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमइआरसी) बेस्टला याबाबत निर्देश दिले होते. याचीच अंबलबजावणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 2019 या वर्षांत बेस्टच्या वीज ग्राहकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.


रवी राजा यांचा आरोप

हरकतीच्या मुद्द्याद्वारे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा विषय मांडला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधुत नियामक आयोगाने बेस्टला वीज ग्राहकांच्या विजेच्या बिलामध्ये कपात करण्याचे निर्देश दिले असाताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप केला आहे.
बेस्ट प्रशासनानं टीडीआर लावून वीज ग्राहकांना लुटण्याचं काम केलं आहे. त्याचप्रमाणे वीज ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल दिलं जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला.

याबाबत बेस्ट प्रशासनानं काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी हा विलंब होत असल्याचं म्हटलं आहे. परंतु, येत्या नवीन वर्षांत बेस्टच्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात कपात करून बिलं पाठवण्याचा निर्णय बेस्टनं घेतला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा