म्हणून लालबागमध्ये ८ दिवस वीज बिल भरणा केंद्र राहणार बंद


SHARE

लालबाग परिसरात गणेशोत्सवाच्या काळात बरीच गर्दी होते. या कारणामुळे लालबागमधील वीज भरणा केंद्र ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला आहे.


कधी राहणार बंद?

शुक्रवार १४ सप्टेंबरपासून शुक्रवार २१ सप्टेंबरपर्यंत लालबागमधील वीज बिल भरणा केंद्र बंद राहणार आहे. तसंच, गौरी गणपतीच्या विसर्जनादिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतच विजेचं बिल भरता येणार आहे. दुपारच्या सत्रात सर्व वीज देयक भरणा केंद्र बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे फिरते वीजदेयक भरणा केंद्र देखील पूर्णत: बंद राहणार आहेत.


पर्यायी व्यवस्था काय?

या कालावधीत ग्राहक ऑनलाईन वीज बिल भरू शकतील किंवा ग्राहकांना इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा, दादर आणि अॅन्सिलरी बिल्डिंग (वडाळा बस डेपो) येथील वीज बिल भरणा केंद्रात बिल भरता येईल.हेही वाचा-

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर २०३० पर्यंत टोल वसुली?

महारेराच्या १३३ पैकी ११९ तक्रारी सोडवल्या सामंजस्यानं; तक्रारदार आणि बिल्डरांमध्ये समेटसंबंधित विषय
ताज्या बातम्या