Advertisement

'या' झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले

वीज बिल भरणा केंद्र ११ मे पासून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

'या' झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले
SHARES

वीज बिल भरणा केंद्र ११ मे पासून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत. महावितरणच्या भांडुप परिमंडलातील पेण व वाशी मंडळ अंतर्गत काही भाग ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये आल्यानं यातील काही केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यात लोकडाऊन लागू करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे  वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरते बंद करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी रायगड व आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी जाहीर केलेल्या कोरोना बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यास प्रतिबंध आहे. तसंच, वीज देयक स्वीकारताना शारीरिक अंतर राखणं, मास्क परिधान करणं, केंद्राबाहेर मार्किंग करणं, हॅन्ड वॉश करणे इत्यादी सुविधा कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना पुरविणे  बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेक सुविधांना ब्रेक लागला आहे. त्याचप्रमाणं, विज भरणा केंद्रही बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळं नागरिकांना ऑनलाइन विज बील आली. तसंच, ऑनलाइन आल्यानं अनेकांना भरणं कठीण झालं. त्यामुळं या ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रीन व ऑरेंज झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले करण्यात आले आहेत. 

खुले वीज बिल भरणा केंद्र

 • उरण ८
 • अलिबाग ९
 • पेण ७
 • गोरेगाव २
 • महाड ७
 • म्हसाळा ६
 • पोलादपूर ५
 • श्रीवर्धन २
 • कर्जत २
 • खालापूर १
 • खोपोली १
 • पनवेल ३
 • माणगाव ४
 • मुरुड २
 • पाली ३
 • रोहा ३
 • तळा २
 • एकूण ६७
संबंधित विषय
Advertisement