Advertisement

...तर एलफिन्स्टनवरची चेंगराचेंगरी टळली असती!


...तर एलफिन्स्टनवरची चेंगराचेंगरी टळली असती!
SHARES

शुक्रवारचा दिवस मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. एलफिन्स्टन स्टेशन आणि परेल स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेली गर्दी, मध्येच कुणीतरी उठवलेली अफवा आणि त्यानंतर सुरु झालेली चेंगराचेंगरी यामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कित्येक जखमी झाले. नेहमीप्रमाणे मृतांचे नातेवाईक आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करुन सरकार कर्तव्यपूर्णतेच्या भावनेतून बाहेर पडले. पण याच सरकारने जर थोडं आधी ऐकलं असतं, तर कदाचित हा शुक्रवार मुंबईकरांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला नसता!



शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी 2016मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रेल्वेच्या काही कामांसदर्भात पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये मुंबईशी संबंधित काही मुद्द्यांचा समावेश त्यांनी केला होता. त्यात एलफिन्स्टन आणि परेल स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाची रुंदी वाढवण्याचाही समावेश होता. विशेष म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी या कामाचा सकारात्मक विचार केला जाईल असं लेखी उत्तर दिलं होतं.

फेब्रुवारी 2016 म्हणजे तब्बल दीड वर्षांपूर्वी सुरेश प्रभूंनी याच ब्रिजच्या रुंदीकरणासाठी सकारात्मकता दर्शवली होती. मात्र त्याचं काम काही सुरु करण्यात आलं नाही. त्यामुळे तेव्हा जर सुरेश प्रभूंनी ऐकलं असतं, तर कदाचित हा शुक्रवार मुंबईकरांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला नसता!



हेही वाचा

एल्फिन्स्टन दुर्घटनेसाठी कोण जबाबदार? सोशल मीडियावर जनतेचा संताप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा