प्रतिक्षानगरमध्ये तरुणांसाठी रोजगार मेळावा

 Pratiksha Nagar
प्रतिक्षानगरमध्ये तरुणांसाठी रोजगार मेळावा
Pratiksha Nagar, Mumbai  -  

आयटीआय, पदवीधर आणि आयटीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 400 तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. त्यातील 272 अशा उत्तम आणि गरजू तरुण-तरुणींची निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यात बजाज अलायन्स, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज, हिंदुस्थान युनिलिव्हर कन्सल्टन्ट, जीएसपीके, स्टार ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, माईंड पूल कन्सल्टन्सी, एलआयसी, बरिस्ता, युरेका फोर्ब्स, फास्ट ट्रॅक सोल्युशन्स, रिलायन्स डिजिटल, टाइम्स प्रो, ए. ए. मार्केटिंग, स्कॅन प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी इन्स्टिट्यूट, एन्टरप्रायजेस, डोमिनोज यांसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा एकूण 19 कंपन्यांचा सहभाग होता.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चा, कोंकण कला आणि शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन प्रतीक्षानगरच्या क्रीडा मंडळ हॉलमध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड, नगरसेविका कृष्णावेणी रेड्डी, विभागातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments