अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई

 Kandivali
अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई
अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई
अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई
अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई
See all

ठाकुर कॉम्प्लेक्स- कांदीवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्पलेक्स परिसरातील अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेनं मंगळवारी कारवाई केलीय. रस्त्यावर 90 फुटांमध्ये वसलेल्या या अनधिकृत फेरिवाल्यांवर पालिकेनं कारवाई केली. या मार्गावरील पदपथावर फेरिवाल्यांनी अनधिकृतपणे आपलं बस्तान बसवून अतिक्रमण केले होते. तसेच त्यामुळे परिसरात अस्वच्छताही पसरली होती. त्यामुळे पालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उचलला. आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी ही कारवाई केली. या अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत पालिकेनं कारवाई केली.

Loading Comments