Advertisement

वांद्र्याच्या केएफसीजवळील अतिक्रमित स्टॉल्स हटवले

वांद्रयातील केएफसी मॉलशेजारील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून ती जागा अडवून बसलेल्या स्टॉल्सविरोधात महापालिकेने धडक कारवाई केली. येथील सर्वच स्टॉल्स हटवून केएफसी मॉल आणि जय महल या निवासी इमारतीमधील परिसर मोकळा करण्यात आला.

वांद्र्याच्या केएफसीजवळील अतिक्रमित स्टॉल्स हटवले
SHARES

वांद्रयातील केएफसी मॉलशेजारील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून ती जागा अडवून बसलेल्या स्टॉल्सविरोधात महापालिकेने धडक कारवाई केली. येथील सर्वच स्टॉल्स हटवून केएफसी मॉल आणि जय महल या निवासी इमारतीमधील परिसर मोकळा करण्यात आला.

मागील वर्षी झाली होती आगीची दुर्घटना

वांद्रयातील लिंकिंग रोडवरील केएफसी मॉलमध्ये मागील वर्षी आगीची दुघर्टना घडून मोठे नुकसान झाले होते. या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व मॉल्ससह शॉपिंग सेंटरमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टिकोणातून नोटीस बजावून तपासणी करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने बजावलेल्या नोटीस विरोधात स्टॉल्सधारकांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती. परंतु, ही स्थगिती उठताच या सर्व स्टॉल्सवर एच- पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली.

केएफसी मॉल आणि जय महल या निवासी इमारतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टॉल्स बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. या सर्व स्टॉल्सवरील कारवाईला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यात आल्यानंतर शनिवारी कारवाई करून स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात आले, अशी माहिती शरद उघडे यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा