अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

 Mumbai
अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

अँटॉप हिल - पालिकेने भारतीय कमलानगरमध्ये शेकडो अनधिकृत वाढीव बांधकामावर शुक्रवारी तोडक कारवाई केली. दरम्यान वडाळा टीटी पोलिसांचा चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

वडाळा सॉल्टपेन रस्त्याला जोडण्यात आलेल्या रस्त्यावरील संगमनगर, भारतीय कमलानगर विभागात रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी पदपथ तसेच उघड्या गटारावर अतिक्रमण केले होते. पदपथ नाहीसे झाल्याने पादचाऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत होता.                                 तसेच गटारे बुजल्याने पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरत होती. यामुळे स्थानिक रहिवाशांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती.                     

मात्र एफ नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी सतत आठ महिने कारवाईचा पाठपुरावा करून एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या आदेशानंतर पालिकेने येथील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले आहे.

तसेच जोपर्यंत पदपथ आणि रस्त्याच्या गटारावरील अतिक्रमण पूर्णतः साफ होत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका एफ नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी सांगितले.

Loading Comments