सायकल स्टॅण्ड की निवासी जागा?

 Mahim Railway Station
सायकल स्टॅण्ड की निवासी जागा?

माहिम - माहिम रेल्वे स्थानकालगत नव्याने उभारण्यात आलेल्या सायकल स्टॅण्डला बेघरांनी विळखा घातला आहे. त्यामुळे सायकल नेमकी कुठे उभी करायची? असा प्रश्न प्रवाशांना पडला असून प्रवाशांनी पालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

माहिम रेल्वे स्थानका रोज सायकलने येणाऱ्या लोकल प्रवाश्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वी माहीम स्थानकालगतच्या फुटपाथचे सुशोभीकरण करताना पालिकेमार्फत हजारो रुपये खर्चून 42 सायकलींसाठी तीन स्टॅण्ड तयार करण्यात आले होते.

या सायकल स्टॅण्डमुळे फुटपाथवरील अतिक्रमणावर आवर घालण्यात यश मिळेल अशी अपेक्षा पालिकेला होती. मात्र अल्पावधीतच येथे बेघरांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केल्याने या सायकल स्टॅण्डची दुर्दशा झाल्याचे दिसत आहे. तसेच या बेघरांवर अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र रेल्वे प्रवासी या जागेत सायकल उभी करत नसल्याने बेघरांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या सायकली रोज येथे पार्क केल्यास बेघर आपोआप कमी होतील असं महानगरपालिका जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिराजदार यांनी सांगितलं.

Loading Comments