पटवर्धन उद्यानाचा अतिक्रमित प्रवेशमार्ग खुला

 Bandra west
पटवर्धन उद्यानाचा अतिक्रमित प्रवेशमार्ग खुला

मुंबई - वांद्र्यातील लिंकिंग रोडजवळील महापालिकेच्या रावसाहेब पटवर्धन उद्यानात प्रवेशद्वाराला अतिक्रमणांनी घातलेला विळखा सोडवण्यात महापालिकेला यश आला आहे. उद्यानाच्या प्रवेद्वाराजवळील पद्पथांवर असलेल्या तब्बल 13 स्टॉल्सवर कारवाई करून ही जागा मोकळी करण्यात आली आहे. अतिक्रमणं मोकळी करून झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने उद्यानासाठीचा प्रवेशद्वार खुला करून देण्यात आला आहे.

वांद्रे पश्चिम परिसरातील रावसाहेब पटवर्धन उद्यानात प्रवेश करण्यासाठी केवळ एकच प्रवेशद्वार असल्याने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या ‘परिमंडळ 3’ चे उपायुक्त वसंत प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. 

यात लिंकिंग रोडच्या पद्पथाजवळील 13 स्टॉल्स हलवून उद्यानात प्रवेश करण्यासाठी जागा मोकळी करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी असणारी उद्यानाची संरक्षण भिंत तोडून साधारणपणे 10 फूटांचे नवीन प्रवेशद्वारही तातडीने उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारामुळे आता नागरिकांना लिंकिंग रोडच्या बाजूनेही उद्यानात प्रवेश करणे किंवा उद्यानातून बाहेर पडणे सहज शक्य होणार असल्याचे शरद उघडे यांनी सांगितले आहे. या प्रवेशद्वारावर लवकरच उद्यानाचा नवीन नामफलक बसविण्यात येणार आहे. तसेच नवीन प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थादेखील तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी त्यांनी सांगितले.

मुंबई पोलीस दलाचे 25 कर्मचारी महापालिकेचे 49 कामगार,कर्मचारी व अधिकारी यांच्यासह ‘एच पूर्व’ विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र नवनी, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) राजेश यादव, उद्यान खात्याचे ज्ञानदेव मुंडे,अतिक्रमण निर्मूलन खात्याचे बेग आणि अनुज्ञापन खात्याचे गरतुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

रावसाहेब पटवर्धन उद्यानाची माहिती

महापालिकेचे रावसाहेब पटवर्धन उद्यान हे पश्चिम उपनगरातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय उद्यान आहे. 18 हजार चौरस मिटरच्या विस्तीर्ण भूखंडावर असणाऱ्या या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बाकडे, मनोरा, हिरवळ आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे-झुडपे आणि वृक्ष आहेत. त्याचबरोबर या उद्यानामध्ये छोट्या मुलांसाठी खेळणी, सार्वजनिक शौचालये, विद्युत दिवे इत्यादी सुविधा आहेत. तसेच या उद्यानाच्या आतील बाजूस मातीची पायवाट (Jogging Track)देखील या उद्यानाचे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. महापालिकेचे रावसाहेब पटवर्धन उद्यान हे सकाळी 5.30 ते 10 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असते.

Loading Comments