मालाडमध्ये 'मनोरंजन'च्या शेवटच्या घटका

 Malad
मालाडमध्ये 'मनोरंजन'च्या शेवटच्या घटका
मालाडमध्ये 'मनोरंजन'च्या शेवटच्या घटका
See all
Malad, Mumbai  -  

मालाड - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा पक्षातर्फे अनेक ठिकाणी भूमिपूजन केले जात आहे. मात्र मालाड पूर्वेकडील महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानाच्या दुरवस्थेकडे कोणत्याच पक्षाच्या प्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही. गेल्या 10 वर्षांपासून या मैदानाची दुरवस्था झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. यासाठी युती सरकारमधील दोन्ही मित्र पक्षांनी उद् घाटनाचा सपाटा सुरू केला आहे. मात्र गेल्या दोन टर्म या परिसरातून निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.


महानगरपालिकेचे मनोरंजनासाठी राखीव असलेल्या मैदानात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. तसेच उद्यानाची संरक्षक भिंत देखील तुटली आहे. याकडे महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर भाजपा नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी मात्र याचं खापर पालिका अधिका-यांवर फोडलंय. गेल्या चार वर्षांपासून याविषयी प्रस्ताव दिला असून महानगरपालिकेचे अधिकारी काम करत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments