Advertisement

अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक गणवेष

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अथवा मोठी घटना घडल्यास स्वत:चा जीव धोक्यात घालत नागरिकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नेहमीच शर्तीचे प्रयत्न करत असतात.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक गणवेष
SHARES

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अथवा मोठी घटना घडल्यास स्वत:चा जीव धोक्यात घालत नागरिकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नेहमीच शर्तीचे प्रयत्न करत असतात. घडलेल्या दुर्घटनेतून नागरिकांना वाचविण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान मदतकार्य करत असतात. मात्र या जवानांच्या सुरक्षेचं काय? त्यामुळं अशा संकट काळात या अग्निशमन दलाच्या जवानांना सुरक्षा मिळावी यासाठी महापालिकेनं दलातील जवानांसाठी वैयक्तिक स्तरावर अधिक संरक्षित असा गणवेष पुरविण्याचे ठरविलं आहे.

पाश्चात्य, विशेषत: युरोपियन दर्जा असलेला गणवेष आग विझविण्यावेळी जवानांसाठी संरक्षक ठरणार आहे. मुंबई पालिकेनं अग्निशमन दलातील जवानांसाठी यापूर्वी २०१७ मध्ये अत्याधुनिक गणवेषांची खरेदी केली होती. त्या गणवेषांची मुदत संपल्यानं पालिकेकडून नवीन गणवेश विकत घेतले जाणार आहेत. त्यासाठी १६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. २०१७ पासून हा नवीन गणवेश आग विझविताना, बचावकार्यात जवांनाना उपयुक्त ठरणारा आहे.

या गणवेशामुळं संपूर्ण शरीर झाकलं जात असल्यानं इजा होण्याची शक्यता कमी झाली. तसेच, आग विझविताना या गणवेशाच्या आधारे आगीचा अधिक काळ प्रतिकार करणं शक्य होत आहे.

महापालिकेकडून आता नवीन गणवेश घेताना युरोपिअन दर्जाच्या अत्याधुनिक गणवेषास पसंती दिली जात आहे. त्यात जवानांना उपयुक्त ठरणारे जॅकेट, ट्राउझर, हूड फायरमन, हातमोजे यांचा समावेश आहे. ही खरेदी करताना त्या गणवेषाच्या दर्जाबाबत त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केली जाणार आहे. त्याप्रकारचे प्रमाणपत्र पुरवठादाराने देणे आवश्यक आहे.

'अशी' करणार खरेदी

  • जॅकेटसाठी ७ कोटी ७२ लाख रुपये
  • ट्राऊझरसाठी ५ कोटी ८० लाख रुपये
  • हूड फायरमनसाठी ६३ लाख १५ हजार रुपये
  • हातमोज्यांसाठी १ कोटी ५० लाख रुपये
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा