• दादरचा ब्रिज फेरीवाल्यांच्या ताब्यात
SHARE

दादर - दादरच्या जुन्या पब्लिक ब्रीजवर फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गेले 8 दिवसात बंद असलेल्या पाय-यांच्या ब्रीजमुळे नागरिक पाय-या नसलेल्या जुन्या ब्रीजचा वापर करत आहेत. मात्र फेरिवाल्यांमुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या पब्लिक ब्रीजवरून येणारे नागरिक तसेच वेस्टर्न लाइनने प्रवास करणारे सर्व प्रवासी या ब्रीजचा वापर करत आहेत. या ब्रीजवर वर्षभर भाजी आणि इतर वस्तू विक्रीसाठी बसणारे फेरीवाले असतात. प्रवाशांना त्रास होत असून देखील हे विक्रीकरणारे आपली जागा सोडत नाहीत. संध्याकाळी या ब्रीजवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे मंदिराबाहेर रांग लावावी, तशी रांग या ठिकाणी नागरिकांना लावावी लागते. त्यामुळे या ठिकाणी झालेले अतिक्रमण महानगरपालिकेने हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या