
मुंबईतील (mumbai) पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत 55 हजार फेरीवाल्यांना ओळखपत्राचे (ID) वाटप करण्यात आले आहे.
फेरीवाल्यांसाठी ओळखपत्र बनवण्यासाठी तब्बल पावणेदोन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) वतीने पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे.
येत्या 31 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. मुंबईतील फेरीवाल्यांवर (hawkers) होत असलेल्या कारवाईनंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटला गेला.
या प्रकरणात फेरीवाल्यांच्या काही संघटना न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी करताना न्यायालयाने निर्देश देत ज्यांची मुंबई महापालिका हद्दीतील सर्वेक्षणात नोंद झाली आहे.
अशा एकूण 99 हजार 435 फेरीवाल्यांना क्यूआर कोडसहित ओळखपत्र देण्यास महापालिकेला सांगितले होते.
एका ओळखपत्रासाठी 168 रुपये मोजले जात असून 99 हजार 435 ओळखपत्रांसाठी 1 कोटी 67 लाख 5 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी डॅक्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा
