Advertisement

अबब, मोगरा नाल्याच्या सफाईवरच सव्वा दोन कोटींचा खर्च!


अबब, मोगरा नाल्याच्या सफाईवरच सव्वा दोन कोटींचा खर्च!
SHARES

मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच अंधेरी पश्चिम येथील एकट्या मोगरा नाल्याच्या सफाईवरच सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेला वाहून जाणारा मोगरा नाला मोठा असला तरी त्यातील गाळ काढण्यासाठी होणारा सव्वा दोन कोटी रुपयांचा खर्च डोळे दिपवणारा आहे.

नाल्यांच्या सफाईला लवकरच सुरुवात

मुंबईतील सर्व नाल्यांच्या तसंच मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व नाल्यांच्या सफाई कामाला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

विधी एंटरप्रायझेसची निवड

नालेसफाईच्या या कामांमध्ये के-पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांच्या प्रणालीत मोडणाऱ्या मोगरा नाल्यातील गाळ काढण्याचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये या नाल्यातील गाळ काढण्यासाठी विधी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड झाली अाहे. गाळ काढून डम्पिंग ग्राऊंडवर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण २ कोटी २३ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

...तर पाणी तुंबण्याची शक्यता

माेगरा नाला हा अंधेरी पूर्व भागातून वाहून येत अंधेरी पश्चिम येथील जीवननगर आदी भागातून जात आहे. हा नाला सर्वांत मोठा असल्यामुळे या नाल्यातील गाळ हा योग्यप्रकारे काढला गेला पाहिजे. आपण स्वत: विरोधी पक्षनेते असताना या नाल्यातील गाळ काढला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करून प्रसंगी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत होतो. परंतु जर यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च होणार असेल तर त्याप्रमाणे स्वच्छताही व्हायला हवी. जर या नाल्यातील योग्यप्रकारे गाळ काढला नाही तर अंधेरी पश्चिमेलाच नव्हे तर पूर्वेकडील भागांमध्येही पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशी भीती माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांनी व्यक्त केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा