रेल्वे स्थानकावरील स्टॉलमधील व एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांवर प्रवाशांकडून अनेकदा टीका करण्यात येते. याबाबत रेल्वे प्रशासनाकडं वारंवार तक्रार करूनही असले प्रकार थांबत नसल्याची चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाश्त्यामध्ये बुरशीयुक्त ब्रेड-बटर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेमुळं मेल-एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
बुरशीयुक्त ब्रेड-बटरबाबत प्रवाशांनी तक्रार दाखल केली असून, आयआरसीटीसीनं कंत्राटदारांवर कारवाई करत त्याला २ लाखांचा दंड ठोठावला आहे. मुंबई सेंट्रल येथून सुटलेल्या शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मंगळवारी सकाळी चहा आणि नाश्ता देण्यात आला. एक्स्प्रेसमधील सी-१ डब्यातील नाश्त्यामध्ये देण्यात आलेल्या ब्रेड-बटरमधील ब्रेडला बुरशी लागल्याचं कांदिवली इथं राहणारे प्रवासी संजय मिश्रा यांच्या निर्दशनास आलं. याबाबत त्यांनी सहप्रवाशांना सांगितले असता अन्य ४ ते ५ प्रवाशांना देखील बुरशी आलेला ब्रेड मिळाल्याचं दिसलं.
Disgusting breakfast being served by the catering team of Shatabdi Express - 12009. The staff deliberately served expired food products during the meals. It can't get more pathetic than this. The authorities are absolutely not bothered about health issues.#irctc#PiyushGoyal pic.twitter.com/YRiIfIcjxo
— Atul Rane (@Aturane88) January 7, 2020
संतापलेल्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यानं सुरत स्थानकात गाडी थांबवण्यात आली. याबाबत प्रवाशांनी आयआरसीटीसीकडं तक्रार दाखल करून त्याचा फोटो ट्वीट केला. स्थानकात डॉक्टरांकडून प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
'ब्रेडच्या वापराची अंतिम तारीख उलटल्यामुळं त्याला बुरशी आल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपासणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गाडीमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून त्याला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांना नाश्त्याचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा -
भारत बंद; २५ कोटी कामगारांचा देशव्यापी संपावर
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू : तनुश्री दत्ता