Advertisement

बीडीडीच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ


बीडीडीच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ
SHARES

मुंबई - नायगाव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या निविदेला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 28 फेब्रुवारीला निविदा खुल्या होणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निविदेला विकासकांकडून ठेंगा दाखवण्यात आल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

नायगाव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या निविदा पूर्व बैठकीला फक्त दोन कंत्राटदारांनीच हजेरी लावली होती. त्यामुळे तेव्हाच या निविदेला विकासकांनी ठेंगा दाखवल्याचे म्हटले गेले. आता निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आलीय. त्यामुळे हे धारावीच्या दिशेनेच हा प्रकल्प जात असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. दरम्यान 13 फेब्रुवारीपर्यंत विकासकांना निविदा सादर करावयाच्या होत्या. त्यानुसार 14 फेब्रुवारीला निविदा खुल्या करण्यात येणार होत्या. पण या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने आता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढीनंतर तरी या निविदेला प्रतिसाद मिळतो का याकडेच मंडळाचं लक्ष लागलं आहे. तर प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा