Advertisement

मालाडच्या इमारतीत १६७ कोरोना रुग्ण? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य

मालाडमधल्या एका इमारतीत १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. पण काय आहे त्यामीगल सत्य? जाणून घ्या...

मालाडच्या इमारतीत १६७ कोरोना रुग्ण? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य
SHARES

कोरोना (Coronavirus Update) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतोना दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. महापालिका देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलंत आहे. अनेक ठिकाणी पालिका (BMC) घराघरात जाऊन स्क्रिनिंग करत आहे. पण सोशल मीडियावर (Social Media) चुकिच्या पद्धतीनं प्रचार करून लोकांच्या मनात भिती पसरवण्यात येत आहे.

याचचं एक उदाहरण म्हणजे मालाडमधल्या (Malad) एका इमारतीत १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अनेक व्हॉट्सअप गृपवर हा फोटो शेअर केला जात आहे. त्यासोबतच मालाडच्या इमारतीत १६७ रुग्ण आढळल्याचा मेसेज देखील व्हायरल होत आहे. पण आम्ही त्या फोटो मागील फॅक्ट चेक केलं तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं.

मालाडमधल्या पठानवाडी परिसरातील ओमकार अल्टा नावाच्या इमारतीचा एक फोटो मंगळवार सराकळपासून व्हायरल होत आहे. या फोटोत इमारतीच्या बाहेर म्हणजेच गेटजवळ पीपीई किट्स घालून डॉक्टर्स आणि पालिका अधिकारी दिसत आहेत. या फोटोसोबत एक मेजेस व्हायरल झाला. त्यात इमारतीत १६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा मेसेज देखील पसरला. पण यामुळे लोकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे.


आम्ही यासंदर्भात झोन नंबर १२चे पोलिस उपायुक्त यांच्याशी बातचित केली. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो खरा आहे. पण तिकडे १६७ कोरोना रुग्ण आढळल्याचा मेसेज खोटो आहे. या इमारतीत पालिकेद्वारे स्क्रिनिंग कॅम्प आयोजित केला होता. त्याद्वारे लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे या इमारतीत १६७ रुग्ण आढळले ही एक अफवा आहे. अशा अफवेवर लोकांनी विश्वास करून चुकिचा मेसेज व्हायरल करू नये.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या नक्कीच सर्वांसाठी चिंतादायक आहे. पण लोकांनी अशा अफवांच्या बळी पडून भतीचं वातावरण पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर पालिका कारवाई देखील करू शकते. जर तुम्हाला देखील गपवर असा फोटो आणि मेसेज आला तर त्याबद्दल योग्य ती माहिती देऊन अफवांचं निरसन करा.

 


हेही वाचा

Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल

मुंबई महापालिकेकडे साडेसहा हजार बेड रिक्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा