Advertisement

मुंबई महापालिकेकडे साडेसहा हजार बेड रिक्त

मुंबईत रुग्णालये आणि कोरोना हेल्थ सेंटरमधील १८ हजार ७४४ खाटांमधील ६ हजार ६२३ खाटा सध्या रिक्त आहेत.

मुंबई महापालिकेकडे साडेसहा हजार बेड रिक्त
SHARES
Advertisement

मुंबईत रुग्णालये आणि कोरोना हेल्थ सेंटरमधील १८ हजार ७४४ खाटांमधील ६ हजार ६२३ खाटा सध्या रिक्त आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्येही हजारो खाटा उपलब्ध आहेत. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 


मुंबईत विविध कोरोना रुग्णालये व कोरोना उपचार केंद्रांमधील खाटांची एकूण क्षमता १२ हजार ४७८ आहे. यापैकी ९ हजार २९९ खाटा भरलेल्या असून ३ हजार १७९ खाटा उपलब्ध आहेत. तर कोरोना केअर सेंटर २ मध्ये सध्या ६ हजार २६६ खाटा उपलब्ध आहेत. यातील २ हजार ८२२ खाटा भरलेल्या असून त्यापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ४४४ खाटा रिक्त असल्याने उपलब्ध आहेत. याशिवाय लक्षणे नसलेल्या आणि संशयित रुग्णांसाठी ठिकठिकाणी मिळून ३२४ कोरोना केअर सेंटर १ मध्ये ४८ हजार ६४० खाटा आहेत. यातील फक्त १६ हजार ३५६ खाटा भरलेल्या आहेत.


ऑक्सिजन पुरवठय़ासह उपचारांची सोय असलेल्या ७ हजार ७०५ खाटापैकी ५ हजार ९८५ व्याप्त आहेत, तर १ हजार ७२० उपलब्ध आहेत. अतिदक्षता उपचारांकरिता असलेल्या १ हजार ३९४ पैकी १ हजार २९० रुग्णशय्यांवर उपचार सुरू असून १०४ बेड उपलब्ध आहेत. तर जीवरक्षक प्रणालीसह उपलब्ध असलेल्या ७७० खाटांपैकी ७४४ व्याप्त असून २६ उपलब्ध आहेत.हेही वाचा -

वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन

अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही

आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा
संबंधित विषय
Advertisement