संपदा मेहता मुंबई शहराच्या नव्या जिल्हाधिकारी

 Mumbai
संपदा मेहता मुंबई शहराच्या नव्या जिल्हाधिकारी
Mumbai  -  

मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी संपदा मेहता यांची नेमणूक करण्यात आली आहे. अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर महिनाभर मुंबई शहर जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. संपदा मेहता या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. संपदा मेहतांसहित पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोबिवली महापालिका आयुक्त ई रविद्रन यांचीही बदली नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून केली आहे.

Loading Comments