Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने थोडक्यात बचावले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून शिंदे सहीसलामत बचावले आहेत. त्यांच्या पायाला थोडा मार लागला असून त्यांच्या चालक मात्र गंभीर जखमी झाला आहे.

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने थोडक्यात बचावले
SHARES

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून शिंदे सहीसलामत बचावले आहेत. त्यांच्या पायाला थोडा मार लागला असून त्यांच्या चालक मात्र गंभीर जखमी झाला आहे. 

कधी घडला अपघात?

शिंदे सोलापूरमधील आपल्या गावी गाडीने निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिंदे यांची गाडी एका डंपरला मागून धडकली. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले, तर चालक गंभीर जखमी झाला. चालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यासोबत गाडीत आणखी चौघेजण होते. शिंदे यांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याने ते याच तयारीसाठी गावी जात होते. अपघातानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. 

हेही वाचा-

दशकानंतर संजय-मनीषा पुन्हा एकत्र

आयुष्यावर प्रेम करायला शिकवणार 'मन उधाण वारा'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा