आयुष्यावर प्रेम करायला शिकवणार 'मन उधाण वारा'

प्रत्येक सिनेमा काही ना काहीतरी शिकवत असतो. त्यामुळंच समाजप्रबोधनासाठीही सिनेमांचा वापर केला जातो. सतिश कौशिक यांची पहिली मराठी निर्मिती असलेला 'मन उधाण वारा' हा चित्रपट आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आहे.

  • आयुष्यावर प्रेम करायला शिकवणार 'मन उधाण वारा'
SHARE

प्रत्येक सिनेमा काही ना काहीतरी शिकवत असतो. त्यामुळंच समाजप्रबोधनासाठीही सिनेमांचा वापर केला जातो. सतिश कौशिक यांची पहिली मराठी निर्मिती असलेला 'मन उधाण वारा' हा चित्रपट आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आहे.


पोस्टरचं अनावरण

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स या बॅनरखाली बनलेल्या 'मन उधाण वारा' या मराठी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण नुकतंच करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स आणि लोका एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच पेन मुव्हीज्चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली 'मन उधाण वारा' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


प्रेमकथा

आयुष्यावर प्रेम करा ते तुम्हाला भरभरुन देतच असतं. अनुभवातून बऱ्याच गोष्टींकडं आपण वेगळ्या दृष्टीनं आणि वेगळ्या प्रकारे जाणीवांच्या पलिकडे पाहू शकतो, हे या चित्रपटात प्रेमकथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोनल गज्जर, रित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या 'मन उधाण वारा' या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून, पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.


वेगळा दृष्टीकोन देणारा

निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच समृद्ध राहिला आहे. या समृद्धतेमुळे अनेक चांगले विषय मराठीत पहायला मिळतात एक वेगळा दृष्टीकोन देणारा 'मन उधाण वारा' चित्रपट प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास सतीश कौशिक यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.हेही वाचा -

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’
संबंधित विषय
ताज्या बातम्या