Advertisement

गणेशोत्सव मंडळांनो, महाप्रसाद बनवायचाय, तर एफडीएकडे नोंदणी करा


गणेशोत्सव मंडळांनो, महाप्रसाद बनवायचाय, तर एफडीएकडे नोंदणी करा
SHARES

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला वेग आला आहे. मंडळाचे कार्यकर्ते जोमात कामाला लागले आहेत. मंडपासह इतर तयारीसाठी आवश्यक ती परवानगी घेण्यासाठीही मंडळाची धावपळ सुरू आहे. अशा वेळी मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून प्रसाद-महाप्रसाद तयार करण्यासाठी परवानगी घेण्याचं आवाहन 'एफडीए'चे सहआयुक्त (अन्न) चंद्रशेखर साळुंखे यांनी केलं आहे. अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्याचं पालन करावं यासाठी लवकरच मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळाची बैठक घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं.


नियम काय आहे?

‌अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजवणं, अन्नाचं वाटप करणं वा अन्नाची विक्री करणे यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी धर्म स्थळीअन्न शिजवण्यासाठी किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस प्रसाद -महाप्रसाद तयार करण्यासाठी वा त्याचं वाटप करण्यासाठी देखील 'एफडीए'ची नोंदणी बंधनकारक आहे. अशी नोंदणी नसेल तर 'एफडीए'ला कारवाई करण्याचा अधिकार आहे.


नियम कशासाठी?

‌विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्न प्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिलं जावं हा यामागचा उद्देश असल्याचं 'एफडीए'चं म्हणणं आहे. त्यामुळे दरवर्षी 'एफडीए'कडून गणेशोत्सव मंडळांना नोंदणी करण्याचं आवाहन केलं जातं.


मोजकी नोंदणी

या कायद्याविषयी जनजागृती नसल्यानं वा कायद्याबाबत उदासीनता असल्यानं तुरळक मंडळच अशी नोंदणी करतात. त्यामुळे 'एफडीए'कडून कायदयाबाबत जनजागृती करत कायद्याच पालन करण्यासाठी मंडळांना आवाहन केलं जातं. त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एफडीए'कडून मंडळाची बैठक बोलवत मंडळांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. ही बैठक आठवड्याभरात आयोजित करण्यात येईल, असंही साळुंखे यांनी सांगितलं.


कारवाईची तरतूद

‌कायद्यानुसार नोंदणी न करणाऱ्या मंडळाविरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. एखादी दुर्घटना घडल्यास दोषींना ६ महिन्यांच्या शिक्षेसह ५ लाखाच्या दांडाची ही तरतूद आहे. मात्र हा मोठा धार्मिक सण असल्याने लोकभावना लक्षात घेत 'एफडीए'कडून कडक कारवाई करण्यात येत नाही. पण मुंबईतील सर्वच मंडळाच्या महाप्रसादावर 'एफडीए'चं लक्ष असतं. त्यानुसार यंदाही 'एफडीए'चे अधिकारी महाप्रसादवर नजर ठेवतील, असं ही सांळुखे यांनी सांगितलं.

गणेशोत्सव समन्वयक समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनीही सर्व मंडळांना 'एफडीए'कडे नोंदणी करण्याच आवाहन करू, अशी माहिती 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.



हेही वाचा-

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम

इको फ्रेंडली गणेश मूर्ती निवडताय? मग 'इथं' बुक करा गणपती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा