आठवड्याभरात 13 हजार 400 कि‍लो दूषित बर्फ जप्त

Mumbai
आठवड्याभरात 13 हजार 400 कि‍लो दूषित बर्फ जप्त
आठवड्याभरात 13 हजार 400 कि‍लो दूषित बर्फ जप्त
See all
मुंबई  -  

महानगरपालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे 1 ते 7 जून दरम्यान 13 हजार 400 किलो दूषित बर्फ जप्त करण्यात आला आहे. चापसी भिमजी मार्ग, पेनिन्सूला पार्क, राणीबाग, बी. ए. मार्ग, ताडवाडी, भायखळा स्थानक मार्ग इथल्या फेरीवाल्यांकडील बर्फ आणि पाण्याच्या नमुन्यात ई-कोलाय जिवाणू आढळून आल्याने पालिकेने ही कारवाई केली. पालिकेने या ठिकाणचा बर्फ जप्त करून तो नष्ट केला आहे.

पुढील प्रमाणे बर्फ नष्ट करण्यात आले -
1 जून - 2 हजार 100 किलो
2 जून - 1 हजार 900 किलो
3 जून - 2 हजार 600 किलो
5 जून - 3 हजार 100 किलो
6 जून - 2 हजार 300 किलो
7 जून - 1 हजार 400 किलो


हेही वाचा

पंधरा दिवसांत पावणेदोन लाख किलो बर्फ जप्त

मुंबईकरांनो! फेरीवाल्यांकडील बर्फ खाल तर...

बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.