Advertisement

मुंबईतील 17 हॉटेल्स अस्वच्छ, 'एफडीए'ने पाठवली नोटीस


मुंबईतील 17 हॉटेल्स अस्वच्छ, 'एफडीए'ने पाठवली नोटीस
SHARES

पावसाळ्याचे दिवस म्हटले की अनेकांना चटपटीत खाण्याचा मोह अनावर होतो. मग पावले वळतात ती हाॅटेल, उपहारगृहाकडे. पण जीभेचे चोचले पुरवताना आपण स्वच्छ ठिकाणच्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्येच खाद्यपदार्थ खात आहोत ना? याचीही खात्री करून घ्या. नसे न केल्यास हॉटेलमधून तुम्हाला थेट डॉक्टरचे क्लिनिकही गाठावे लागू शकते.

कारण अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने मागील 15 दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुंबईतील 17 अस्वच्छ हॉटेल, उपहारगृहांना नोटीस बजावल्याची माहिती सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार स्वच्छ आणि सुरक्षित जागीच अन्न शिजवले जावे यासह स्वच्छेतेच्यादृष्टीने अनेक नियम हाॅटेल व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्याचे पालन केले जाते की नाही यादृष्टीने 'एफडीए'कडून दैनंदिन तपासणी होत असते.

तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवत हाॅटेल आणि उपहारगृहातील स्वच्छतेची तपासणी केली जाते. त्यानुसार गेल्या 15 दिवसांपासून मुंबई विभागाने या मोहिमेला सुरूवात केली आहे.15 दिवसांत 52 तपासण्या

पावसाळी विशेष मोहिमेद्वारे 'एफडीए'ने मुंबईतील 52 हाॅटेल-उपहारगृहांची तपासणी केली आहे. त्यानुसार 17 हाॅटेल-उपहारगृहांकडून अन्न सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याचे समोर आले आहे.

अस्वच्छ जागी अन्न शिजवणे, स्वच्छतेचे नियम न पाळणे, ड्रेनेजची योग्य सुविधा नसणे, माशा, मच्छरांचे साम्राज्य अशा एक ना अनेक कारणांखाली या 17 हॉटेल, उपहारगृहांवर कारवाई केल्याचे 'एफडीए'ने सांगितले आहे.

या 17 हाॅटेल-उपहारगृहांना नोटीस बजावत स्वच्छतेच्यादृष्टीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ही विशेष मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने या कारवाईत आणखी हॉटेल, रेस्टॉरंटचा समावेश होण्याची शक्यता आहे.


अन्यथा परवाना रद्द

नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांत स्वच्छतेच्यादृष्टीने उपाययोजना या हाॅटेल-उपहारगृह मालक-चालकांनी न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचा परवाना तात्पुरता वा कायमस्वरूपी रद्द होण्याचीही शक्यता आहे.हे देखील वाचा - 

बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपूनडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा