Advertisement

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी! दूध भेसळखोरांवर कारवाई कधी?

२०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय भेसळयुक्त दुधाच्या सेवानामुळं कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. मुंबईसह राज्यभर दूध भेसळखोरांचा सुळसुळाट असून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं म्हणत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीपासून मुंबई ग्राहक पंचायतीपर्यंत सर्वांनीच दूध भेसळखोरांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी! दूध भेसळखोरांवर कारवाई कधी?
SHARES

ब्रॅण्डेड दुधाच्या पिशव्या फाडून त्यात पाणी टाकून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नुकताच अन्न आणि औषध प्रशासनानं केला होता. या आणि याआधी झालेल्या कारवाईतून मुंबईकर भेसळयुक्त दूध पितात हे स्पष्ट होत असतानाच आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. देशभरातील तब्बल ६८ टक्के दुधात भेसळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा खुलासा खुद्द केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहुवालिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय भेसळयुक्त दुधाच्या सेवानामुळं कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. या दोन्ही धक्कादायक खुलाशांमुळे नागरिकांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. मुंबईसह राज्यभर दूध भेसळखोरांचा सुळसुळाट असून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं म्हणत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीपासून मुंबई ग्राहक पंचायतीपर्यंत सर्वांनीच दूध भेसळखोरांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.


'हे' पदार्थ टाकून भेसळ

जन्मलेल्या मुलापासून वृद्धापर्यंत सर्वजण दुधाचं सेवन करतात. दिवसाची सुरूवातच दुधाने, चहाने होते. त्यामुळे दुधाला मोठी मागणी आहे. या मागणीचा फायदा उठवत मुंबईसह देशभर दूध भेसळखोर सक्रीय झाले आहेत. दुधात पाणी मिसळण्यापर्यंतच ही दूधभेसळ मर्यादीत राहिलेली नाही. तर भेसळखोर दुधात स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, अमोनियम, मीठ, न्युट्रीलायजर, हायड्रोजन पेराॅक्साईड, डिटर्जंट पावडरसारखे पदार्थ टाकत भेसळ करत आहेत. असं दूध पिणं हे आरोग्यास घातक असून त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवतो हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे.


कॅन्सरचा धोका

असं असताना देशातील ६८ टक्के दूध भेसळयुक्त असल्याचं आणि २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय अशा दुधाच्या सेवनामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडतील, असा खुलासा समोर आल्यानं प्रत्येकाच्याच मनात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दूधभेसळ होत असल्याचं वारंवार समोर आलं असतानाही राज्य सरकारकडून आणि 'एफडीए'कडून कोणतीही ठोस पावलं उचचली जात नसल्यानं दूधभेसळखोरांचं फावत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी डाॅ. अजित नवले यांनी केला आहे.


किती लिटर दुधाचं वितरण?

राज्यात संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात मिळून सरासरी प्रतिदिन २ कोटी ८० लाख लीटर दुधाचं वितरण होत. प्रत्यक्षात शेतकऱ्याकडून होणारं आणि परराज्यातून येणारं दूध असं एकूण दुधाचं उत्पादन वितरणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे. केमिकल वापरून लाखो लिटर भेसळयुक्त दूध तयार करत वितरण वाढवलं जात असल्याचंही नवले यांनी म्हटलं आहे.




'एफडीए'कडून चालढकल

माहिती अधिकार कार्यकर्ते यजुर्वेदी राव यांनी मुंबईतील गल्लीबोळापासून ते दूध कंपन्यापर्यंत सर्वच ठिकाणी दुधात भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर 'एफडीए'ला याची संपूर्ण माहिती असतानाही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दुधभेसळ रोखायची असेल आणि दूध भेसळखोरांना चाप बसवायचा असेल तर दैनंदिन कारवाई होण्याची गरज असल्याचही मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान मुंबई ग्राहक पंचायतीनं दोन वर्षे मुंबईतील दुधभेसळीचा अभ्यास करत २०१४ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र या अहवालाकडेही 'एफडीए' आणि राज्य सरकारनं कानाडोळा केल्यानं दूधभेसळ पर्यायानं नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं ग्राहक पंचायतीचं म्हणणं आहे.


कठोर पाऊल उचलणार

याविषयी एफडीएच्या आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दूधभेसळ रोखण्यासाठी एफडीए गंभीर असून नियमितपणे कठोर पावलं उचलली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. यापुढंही कठोर पावल उचलतं दूध भेसळीविरोधातील मोहीम तीव्र करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा-

सावधान! ब्रॅंडेड दुधाच्या पिशवीत भेसळयुक्त दूध, भेसळखोरांचं रॅकेट उघड

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा