Advertisement

बोरिवलीत बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भिती

बिबट्याने कुत्र्यावर झडप घालून त्याला पळवून नेहण्याचा बिबट्याने प्रयत्न केला. मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने इमारतीतील रहिवाशांनी घराबाहेर डोकावले असता. बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर रहिवाश्यांनी बिबट्याला पळवून लावले.

बोरिवलीत बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भिती
SHARES

बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या अभिनव परिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरातून बिबट्याने मागील आठवड्याभरात दोन कुत्र्यांची शिकार केली आहे. याचे सीसीटिव्ही फूटेज  सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

बिबट्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हे प्रकार आता दिवसेंदिवस वाढतच आहेत. बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ असाच एक दुर्देवी प्रकार घडलाय. संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या अभिनव नगर परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्या परिसरात शिरून भटक्या कुत्र्यांची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी अशाच भटक्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या रहिवाशीस्थित इमारतीत शिरला होता. बिबट्याने कुत्र्यावर झडप घालून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 

मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने इमारतीतील रहिवाशांनी घराबाहेर डोकावले असता बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर रहिवाशांनी बिबट्याला पळवून लावले. एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. रात्री ७ नंतर इमारती परिसरात लहान मुलांना खेळण्यास त्यांचे पालक मनाई करत आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा