• सिने, टीव्ही कामगारांचा संप सुरूच
SHARE

गोरेगावच्या फिल्मसिटी स्टुडिओसमोर गेल्या ८ दिवसांपासून सिनेमा आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील २२ संघटनांच्या कामगारांचा संप सुरू आहे. या संपकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत सरकारने चर्चा करूनही या संघटनांनी संप सुरूच ठेवला आहे.मंगळवारी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावले होते. राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्योसाबत सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा झाली. या चर्चेसाठी निर्मात्यांच्या संघटनेला मात्र बोलावण्यात आले नव्हते. या बैठकीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, भाजपा प्रवक्ते अतुल शाह देखील उपस्थित होते.

सिनेमा आणि टीव्ही कामगारांना पीएफ सोबतच इतर सुविधा देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक धोरण बनविण्याच्या तसेच पुढच्या बैठकीत निर्मात्यांच्या संघटनेला चर्चेसाठी बोलविण्याच्या सूचना यावेळी निलंगेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सिने एम्प्लॉईज संघटनेने उपोषण मागे घेण्याचे जाहीर केले. परंतु जोपर्यंत निर्मात्यासोबत करार होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि जनरल सेक्रेटरी दिलीप पिठवा यांनी घेतला.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या