Advertisement

सॅल्युट! पोलिस हेड काँस्टेबलची सरकारला आर्थिक मदत

सेलिब्रिटी आणि उद्योजकांचं कौतुक करून झालं असेल तर मुंबईतल्या या 'वर्दीतल्या माणुसकीला' पण सलाम करा.

सॅल्युट! पोलिस हेड काँस्टेबलची सरकारला आर्थिक मदत
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांचा आकडा ३३५ वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत. या परिस्थितीत सरकारला आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यक्ता आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजकांनी सरकारला आर्थिक मदत केली आहे. या सरगळ्यांचं कौतुक केलं गेलं.

पण सेलिब्रिटी आणि उद्योजकांचं कौतुक करून झालं असेल तर मुंबईतल्या या वर्दीतल्या माणुसकीला पण सलाम करा. पोलिस हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री कोरोना सहय्यता निधीत १० हजार रुपयांची मदत केली आहे. ते मुंबईतल्या डोंगरी भागातील आहेत. श्रीदर्शन डांगरे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द केला. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांचं महाराष्ट्राच्या जनतेतर्फे कौतुक आणि आभार मानले आहे.

पोलीस नेहमीच आपल्या रक्षणासाठी पुढे असतात. देशावर कोसळलेल्या कोरोना संकटापासून रक्षण करण्यासाठी हजारो पोलिस २४ तास कार्यरत आहेत. हातावरचं पोट असणाऱ्या गोरगरीबांना पोलिसांकडून जेवण दिलं जात आहे. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. काही पोलिस मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीला योगदान देत आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा