Advertisement

धारावी कचरामुक्त होणार


धारावी कचरामुक्त होणार
SHARES
Advertisement

धारावी - धारावीला कचराकुंडी मुक्त करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतलाय. स्थानिक नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी, वकिल शेख आणि जोशना परमारची मदत घेऊन पालिका जी - उत्तर विभागातर्फे धारावीतल्या गल्लीबोळात जनजागृती अभियान राबविण्यात येतय. या अभियानासाठी धारावीतील सर्वाधिक लोकवस्ती असलेला 60 फूट रस्ता व 90 फूट रस्ता अशी दोन ठिकाणे पालिका अधिकाऱ्यांनी निवडली आहेत. 60 फूट रस्त्यावरील 11 कचराकुंड्या तर 90 फूट रस्त्यावरील 5 कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत.

कचराकुंड्यांच्या जागेवर सकाळी 7 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पालिकेच्या कचरा घेऊन जाणाऱ्या छोट्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. हटविण्यात आलेल्या कचराकुंडीच्या जागेत पालिकेची छोटी वाहने कायमस्वरूपी उभी राहणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement