बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाला आग

फोर्ट येथील उच्च न्यायालयाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या मुख्य इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी भीषण आग लागली. बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. 

घटनास्थळी अग्नीशमनदलाच्या आठ गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच इमारतीतील सर्वच कर्मचारी सुखरूप बाहेर आले. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.


Loading Comments