अंधेरीत बंगल्याला भीषण आग

Andheri west, Mumbai  -  

अंधेरीतल्या जे. पी. रोड परिसरात असलेल्या किनो कॉटेज बंगल्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीसंदर्भात दोन नंबरचा कॉल देण्यात आला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी 12.40 वाजता आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. घटनास्थळी दाखल झालेल्या 1 फायर इंजिन, 4 जेटी आणि एका डब्ल्यूटीच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली.

Loading Comments