Advertisement

आरे कॉलनीजवळील डोंगरावर भीषण आग, वनसंपदा धोक्यात


आरे कॉलनीजवळील डोंगरावर भीषण आग, वनसंपदा धोक्यात
SHARES

मुंबईच्या गोरेगावमधील आरे कॉलनीलगतच्या डोंगरावर सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भीषण अाग लागली. आगीचे आणि धुराचे लोट गगनाला भिडल्याचे दिसत होते. अागीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. अग्निशमनचे जवान शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
४ किलोमीटरपर्यंत पसरली 

नॅशनल पार्कलगतच्या अारेच्या जंगलात लागलेली ही भीषण अाग ४ किलोमीटरपर्यंत पसरली अाहे. दूरपर्यंत अागीचे लोळ दिसत अाहेत. या अागीमुळे वनसंपदा धोक्यात अाली अाहे. दरम्यान, ही अाग मुद्दाम लावल्याचे बोलले जात अाहे. 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा