Advertisement

ग्रॅण्ट रोडच्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला आग


ग्रॅण्ट रोडच्या रिलायन्स फाऊंडेशन  रुग्णालयाला आग
SHARES

मुंबईच्या ग्रॅण्ट रोड परिसरातील रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर  सुरू आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील बहुतांश रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या अंदाजे चौथ्या माळ्यावर ही आग लागल्याचे कळते. आग कशी लागली हे अद्याप कळू शकले नसून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बघ्यांच्या गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरत रिकामा केला आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या  ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग कशी लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.

संबंधित विषय
Advertisement