Advertisement

मुंब्राच्या कौसाच्या पेट्रोलपंपाजवळ आग

एका प्लास्टिक पीवीसी फिटिंगचे सामान वाहून नेणाऱ्या एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली

मुंब्राच्या कौसाच्या पेट्रोलपंपाजवळ आग
SHARES

ठाणे येथील मुंब्रा येथील परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना कौसा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका गोदामाला लागल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचाः- महिलांना लोकल प्रवास: रेल्वेला राज्य सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा

 दरम्यान, काल सुद्धा मुंब्रा जवळील बायपास येथे एका प्लास्टिक पीवीसी फिटिंगचे सामान वाहून नेणाऱ्या एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रिजनल डिजास्टर मॅनेजमेंट सेल आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.  अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तसेच या घटनेत सुद्धा जिवीतहानी झाली नाही. याआधी सुद्धा १४ ऑक्टोंबरला ठाण्यातील दिवा परिसरात असलेल्या एका दुकानाला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी सुद्धा कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय