Advertisement

फोर्ट परिसरातील इमारतीला आग, १ जण गंभीर जखमी

फोर्ट इथं लागलेल्या आगीत २२ वर्षांचा तरुण ३० ते ३५ टक्के जखमी झाल आहे.

फोर्ट परिसरातील इमारतीला आग, १ जण गंभीर जखमी
SHARES

मुंबईत सध्या आगीच सत्र सुरू असून बुधवारी २ ठिकाणी आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या एका इमारतीला आणि वरळी परिसरातील एका इमारतीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

मुंबईच्या फोर्ट परिसरातील बाहुबली इमारतीला संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमाराला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि पाण्याचे ५ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ट इथं लागलेल्या आगीत २२ वर्षांचा तरुण ३० ते ३५ टक्के जखमी झाल आहे.

दीपक दिलदार असं या तरुणांचं नाव असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. फोर्ट परिसरातील इमारतीला आगीचं कारण अद्याप अस्पष्ठ आहे. मात्र, या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ही झालं. तसंच, वरळी येथील उंच इमारतीला शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची माहिती समोर येत आहे. 



हेही वाचा -

गुड न्यूज! मुंबईबाहेरील पुनर्विकासाला चालना, MMR साठी वेगळं ‘एसआरए’

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १९० नवीन कोरोना रुग्ण


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा