• पवईच्या सेंटर अॅव्हेन्यू मॉलला आग
SHARE

पश्चिम उपनगरातील पवई येथील प्लाझा सेंटर अॅव्हेन्यू या मॉलमधील एका दुकानाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर हिरानंदानी गार्डनजवळ प्लाझा सेंटर अॅव्हेन्यू हा मॉल आहे. या मॉलमधील एका दुकानाला सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन अर्ध्या तासात आग विझवली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या