Advertisement

वर्सोवा - LPG सिलेंडर गोदामाला आग, ४ जण जखमी

वर्सोवा इथल्या LPG सिलेंडर गोदामात स्फोट झाल्यानंतर आग लागली आहे.

वर्सोवा - LPG सिलेंडर गोदामाला आग, ४ जण जखमी
SHARES

वर्सोवा इथल्या LPG सिलेंडर गोदामात स्फोट झाल्यानंतर आग लागली आहे. ही घटना यारी रोडवरील अंजुमन स्कूल परिसर जवळ सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी घडली. अग्निशमन दलानं लेव्हल २ ची आग असल्याचं घोषित केलं आहे.

आतापर्यंत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या ओपीडीत उपचार सुरू आहेत. या स्फोटांमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.

स्थानिक प्रशासकिय कर्मचार्‍यांसह अग्निशमन इंजिनची आठ वाहनं आणि सात जंबो पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई शहर आणि लगतच्या भागात आगीची ही चौथी घटना आहे.

अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी साइटचे फोटो आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत. "सर्वात भयानक गोष्ट म्हणजे गोदाम निवासी इमारतीच्या मध्यभागी अगदी बरोबर आहे. असं काहीही कधी पाहिलेलं नव्हतं," एका युजरनं ट्विटरवर लिहिलं आहे.

यापूर्वी मानखुर्दमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सतत २० तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीवर नियंत्रण मिळवताना एक अग्निशामक जखमी झाला होता.



हेही वाचा

ठाण्यातील मॉडेलला कॉलनीत आग

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा